Karnatak Dog Accident: रस्ता ओलांडताना कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल (Watch Video)
रस्ता ओलांडत असाताना एका कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीने धडक दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकातील बेंगळुरु रोडवर घडली आहे.
Karnatak Dog Accident: रस्ता ओलांडत असाताना एका कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीने धडक (Accident) दिल्याचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकातील बेंगळुरु रोडवर घडली आहे. हेल्मेट नसलेला एक व्यक्ती दुचाकी घेऊन जात असतो त्यावेळीस दुचाकीवरून जात असताना, त्याने कुत्र्याच्या पिल्लाला धडक दिली. व्हायरल व्हिडिओवर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला. (हेही वाचा- रिक्षा पार्किंगच्या मुद्यावरून मित्राची हत्या, आरोपीला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव दुचाकी चालवत कुत्र्याच्या पिल्लाला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच,अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बेधडकपणे दुचाकी चालवत असल्याचे व्हिडिओ दिसत आहे. कुत्र्यांच्या पिल्लूचे अपघात झाल्याचे पाहून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातस्थळावरून त्याला कडेला घेतले.
पाहा व्हिडिओ
Brutal #Accident on #Bengaluru roads,#Dog #Puppy came under wheels@blrcitytraffic @BlrCityPolice pic.twitter.com/PugXKeY7Tm
— NaNu Watching (@Namma_watching) August 4, 2024
रस्त्या ओलांडून कुत्र्याचं पिल्लू पलीकडे जात होता परंतु त्या वेळी दुचाकी जात होती. त्याने वेळीच ब्रेक मारला असता, तर हा अपघात टळला असता. दुचाकीने इतक्या जोरात धडक दिली की, कुत्र्याचे पिल्लू गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ पाठीमागून येणाऱ्या एकाने फोनमध्ये कैद केला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 02:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

