Uddhav Thackeray | X @IANS

सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियन या दोघांच्याही मृत्यूमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी आज सत्ताधार्‍यांकडून करण्यात आली. आता दिशा सॅलियनच्या वडिलांनीही मुलीच्या मृत्यूची पुन्हा सखोल चौकशी व्हावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान यावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना आज विधिमंडळ परिसरात मीडीयाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी हे आरोप खोटे आहेत. 'आमच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आल्या आहेत. या प्रकरणांशी आमचा दुरान्वयेही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.'

उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन आले की हा मुद्दा काढला जातोच. मला आश्चर्य वाटले मागील दोन अधिवेशनात हा मुद्दा का नव्हता आला? दरम्यान खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. दिशा सॅलियन प्रकरणामध्ये काही पुरावे असतील तर कोर्टात द्या. तेथे बघू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरेंनीही देखील 5 वर्षांपासून हे आरोप बदनामीच्या उद्देशाने होत असल्याचं आज म्हटलं आहे. नक्की वाचा: Disha Salian Death Case: सत्ताधाऱ्यांकडून अटक करण्याची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोर्टात बोलू'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद .

'शेतकऱ्याच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण ? शेतकऱ्याच्या माता भगिनी टाहो फोडत आहेत. संतोष देशमुख प्रकरणाप्रमाणे अनेकांची हत्या झाली. त्यांची मुले न्याय मागत आहेत. त्याबद्दल सरकारची भूमिका काय?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज केला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून आदित्य ठाकरेंवर आरोप होत असल्याचं म्हटलं असलं तरीही नितेश राणेंनी हे आरोप राजकारणातून केलेले नाहीत. असे सांगितलं आहे. जर हे आरोप राजकारणातून केलेले आहेत मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनदा फोन करून आदित्य ठाकरेंना वाचवा असं का सांगितलं? असाही प्रश्न विचारला आहे. यावेळी त्यांनी बोलताना किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया देताना दिशाच्या पालकांकडून पैशांची मागणी होत असल्याचंही ते म्हणाले आहेत.