Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियनच्या (Disha Salian) मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांनी शिवसेना यूबीटी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, भाजप आमदार नितेश राणे यांनी यावर भाष्य करताना सांगितले होते की, ते पहिल्या दिवसापासून म्हणत होते की ही हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी गुरुवारी एक खळबळजनक दावा केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील नारायण राणे यांना फोन करून या प्रकरणात त्यांचा मुलगा (आदित्य) वाचवण्याची विनंती केली होती. राजकीय फायद्यासाठी हा खटला पुन्हा उघडण्यात आला आहे या विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘हा राजकीय आरोप नाही. दिशाचे वडीलही आता खोटे बोलत आहेत का?.... काल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की तिचे वडील पैसे मागत होते... तिच्या वडिलांवर असे आरोप केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे.’

Disha Salian Death Case: 

ते पुढे म्हणाले, ‘जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल की आपण सर्वजण राजकीय आरोप करत आहोत, तर त्यांनी राणे साहेबांना फोन करून 'या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा' असे का म्हटले? त्यांनी नारायण राणेंना दोनदा फोन करून त्यांच्या मुलाला वाचवण्याची विनंती केली...’ दरम्यान, सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या वादामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद पुन्हा सुरू झाला आहे. सतीश सालियन यांनी 2020 मध्ये झालेल्या तिच्या दुःखद मृत्यूची नवीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (हेही वाचा: Disha Salian Death Dase: सत्ताधाऱ्यांकडून अटक करण्याची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोर्टात बोलू'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद)

त्यांच्या याचिकेत त्यांनी शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे हस्तांतरित करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आज तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘दिशाच्या वडिलांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की त्यांच्यावर दबाव आणला जात होता आणि बरेच पुरावे लपवण्यात आले होते. त्यांनी एकता कपूर, दिनो मोरिया आणि आदित्य पंचोली सारख्या लोकांची नावे घेतली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड तपासण्यास सांगितले.’