नाशिक महापौर विरोधात  दिनकर पाटील, गजानन शेलार आणि सलीम शेख यांचं ठिय्या आंदोलन
BJP's 2019 Lok Sabha Election Slogan (Photo Credits: BJP/Twitter)

नाशिकमध्ये महापौर रंजना भानसी(Ranjana Bhansi) यांच्याविरोधात भाजपाचे दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख यांनी ठिय्या आंदोलन कायम ठेवले आहे. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न सुटावा, महापालिकेने सील केलेल्या मिळकती खुल्या करून त्यांना 10 रुपये चौरस फुटाने भाडेआकारणी करावी, सिडकोला डीसीपीआरमधून वगळावे आणि सेंट्रल किचनऐवजी बचतगटांना काम देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र महापौरांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे. नाशिक शहरामध्येही मॉल्समध्ये मोफत पार्किंग; महापालिकेत प्रस्ताव मंजूर

मंगळवार (25 जून) दिवशी आक्रमक होत दिनकर पाटील यांनी आंदोलनाला सुरूवात केली. त्यानंतर आठ तास चाललेल्या चर्चेनंतर महापौरांनी चार विषयांवर निर्णय दिला असला तरी त्यावर पाटील असमाधानी होते. त्यामुळे जोपर्यंत हे प्रश्न निकाली निघत नाहीत, तोपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

महापौर आणि दिनकर पाटील हे दोन्ही भाजपा पक्षाचे असल्याने नाशिकमध्ये सध्या अनेक उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.