धुळे महानगरपालिका निवडणूक 2018 : MIM च्या तीन उमेदवारांचा विजय
Dhule Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Dhule Municipal Corporation Election 2018 Poll Results: राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणूकीचा निकालाची मतमोजणी अजून सुरु आहे. या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मात्र धुळे येथे भाजप (BJP) पक्षातून बाहेर पडलेले अनिल गोटे यांचा 'लोकसंग्राम' पक्ष भाजपाला टक्कर देणार आहे.

गेल्या काही दिवसात पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्याचे बाकी आहेत. तत्पूर्वी काल झालेल्या धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणूकीच्या निकालाकरडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर धुळ्यात एकूण 74 जागा असून बहुमताचा आकडा 38 वर जाऊन पोहचला आहे. तसेच एमआयएमचे (MIM) या पक्षाचे तीन उमेदवार धुळ्यात विजयी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

धुळेकरांचा कौल

लोकसंग्राम पक्ष - 5

भाजप - 29

शिवसेना- 7

कॉंग्रेस- राष्ट्रवादी- 28

इतर - 5

एकूण- 74

(उर्वरित निकाल लवकरच...)