दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Diwas 2024) साजरा केला जातो. हा दिवस भारतीय बौद्धांचा प्रमुख सण आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच विविध बौद्ध स्थळांवर हजारो बौद्ध अनुयायी एकत्र येतात. आता धम्मचक्र प्रवर्तन दिवस 2024 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
जाणून घ्या गाड्यांचा तपशील-
- लोकमान्य टिळक टर्मिनस (एलएलटी-LLT)-नागपूर अनारक्षित विशेष-
01017 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 11.10.2024 रोजी 14.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी.
- नागपूर-एलटीटी स्पेशल-
01018 विशेष गाडी 13.10.2024 रोजी नागपूरहून 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
- नागपूर-एलटीटी स्पेशल-
01218 स्पेशल नागपूर 12.10.2024 रोजी 22.05 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 14.35 वाजता पोहोचेल. (हेही वाचा: Dhammachakra Pravartan Din 2024 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी आहे? तारीख, महत्त्व आणि इतिहास घ्या जाणून)
01018 आणि 01218 साठी थांबे- सिंदी, सेवाग्राम (फक्त 01218 साठी), वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.
- नागपूर-पुणे अनारक्षित विशेष-
01215 विशेष गाडी 12.10.2024 रोजी नागपूरहून 23.00 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 20.00 वाजता पोहोचेल.
- पुणे-नागपूर सुपरफास्ट स्पेशल-
01216 स्पेशल पुण्याहून 11.10.2024 रोजी 16.00 वाजता निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी 06.45 वाजता पोहोचेल.
01215 आणि 01216 साठी थांबे- अजनी (फक्त 01216 साठी), सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड दोरमार्ग
- भुसावळ–नागपूर–नाशिक रोड मेमू स्पेशल-
01213 मेमू स्पेशल 12.10.2024 रोजी भुसावळहून 04.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे- मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी
01214 मेमू स्पेशल नागपूरहून 12.10.2024 रोजी 23.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.10 वाजता नाशिकरोडला पोहोचेल.
थांबे- सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड
बुकिंग- रेल्वेद्वारे 01216, 01018 आणि 01218 या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 07.10.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.