Devendra Fadnavis: अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही पण..उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

अब्दुल सत्तारांच्या बोलण्याचं मी समर्थन करणार नाही पण विरोधकांनी देखील खोकेखोके बोलण योग्य नाही अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

महाराष्ट्र Snehal Satghare|
Devendra Fadnavis: अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही पण..उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

राज्यात गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) विरुध्द अब्दुल सत्तार (Abdul Sattar) असा वाद शिगेला पेटला आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अनेक बड्या नेत्यांकडून सत्तारांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी होत आहे पण आता पर्यत शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Government) याबाबत कुठलही अधिकृत वक्तव्य केलेले नव्हत. पण आज देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) हा गोंधळ संपवत अखेर सांगून टाकलं की अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) बोलण्याचं मी समर्थन करणार नाही पण विरोधकांनी देखील खोकेखोके बोलण योग्य नाही हे ही बरोबरचं आहे. दोन्ही बाजूंनी समतोल सांभाळला गेला पाहिजे. महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारणाची पातळी घसरत चाल्ली आहे. त्यामुळे पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्षातील प्रत्येकाला ही बाब समजावून सांगणार नाही तेव्हा पर्यत हे शक्य होणार नाही.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले, "कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चूकच आहे," असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. तसंच "राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे," असं मतही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. (हे ही वाचा:-Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा, म्हणाले..)

 

सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) खोके आरोपास प्रत्त्युत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरल्याने राष्ट्रावादी कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. एवढचं नाही तर कॉग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडून (Shivsena) देखील सत्तारांच्या वक्तव्यास विरोध दर्शवत राष्ट्रवादीस (NCP) पाठींबा दिला आहे. तसेच आता महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणजे राज्यभरातील विरोधकांकडून अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) वक्तव्याचा निषेध करत सत्तारांचा राजीनामा (Resignation) मागितल्या जात आहे. तरी यावर सावध भुमिका घेत देवेंद्र फडणवीसांनी सुचक वक्तव्य केलं आहे. दोन्ही बाजूंनी शांतता बाळगावी आणि या पध्दतीची भाषा वापरु नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस
Close
Latestly whatsapp channel