Devendra Fadnavis | (File Photo)

मागील महिन्याभरापासून मुंबईत क्रुझ पार्टीवरील एनसीबीच्या कारवाईची चर्चा आहे. दिवसागणिक आर्यन खान क्रुझ पार्टी केस मध्ये नवे खुलासे होत असताना भाजपाच्या मनोज कंबोजच्या मास्टरमाईंडने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केल्या नंतर आता नवाब मलिकांनाही (Nawab Malik) भाजपाने निशाण्यावर धरलं आहे. नवाब मलिकांनी कुर्ला (Kurla) मध्ये अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा दावा फडणीसांनी केला आहे. मुंबई 93 बॉम्बस्फोट मध्ये संबंधित दोषी आरोपी सरदार शाहवली खान आणि

सलीम पटेल यांच्यासोबत मलिकांनी जमीन व्यवहाराचा सौदा केल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मलिकांच्या 5 पैकी 4 जमीन व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्डच्या लोकांचा हात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे. मुंबईत कुर्ला भागातील एलबीएस मार्गावर 3 एकरच्या आसपासची जागा 20 लाखात घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नवाब कुटुंबाचा सौदा झालेल्या जागेच्या मालकांवर टाडा लागलेला होता मग अशा परिस्थितीमध्येही एका मंत्र्याने कशी जमीन विकत घेतली? असं देखील त्यांनी म्हटलं आहे. टाडा आरोपींची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी नवाबाच्या कुटुंबियांनी हा प्रकार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे याबाबत पुरावे आहेत तसेच ते संबंधित तपास यंत्रणांना आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतीही गोष्ट किंवा क्लायमॅक्स दाखवायला समोर आलेलो नाही तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची माहिती समोर घेऊन आल्याचं म्हटलं आहे.

सरदार शहावली खान मुंबई 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे सध्या त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्याने आरडीएक्स भरलं होतं तर सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसिना पारकर चा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. . सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा कमावला जात असे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा दावा  

कुर्ला मध्ये एलबीएस मार्गावर फिनिक्स मार्केट सिटीच्या जमिन खरेदी वेळेस 2005 मध्ये 30 लाखात जमीन खरेदी केली त्यामध्ये 15 लाख मालकाला न देता पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात वळते झाले होते. तर 10 लाख शहावलीला देण्यात आले. 5 लाख नंतर मिळतील असं सांगून एकूण 20 लाखात तेव्हा हा व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 2003 मध्ये हा सौदा सुरू झाला तेव्हा नवाब मलिक मंत्री होते.

मुंबई बॉम्बब्लास्ट ची घटना भयंकर होती. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरलं अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? असा सवाल मलिकांना करताना 4 व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्डचा अ‍ॅंगल असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

एनसीपी नेते नवाब मलिकांनी NCB झोनल हेड समीर वानखेडे यांच्या विरोधात खंडणीचे आरो तसेच सरकारी नोकरी बळकवण्यासाठी खोट्या जातप्रमाणपत्राचा वापर केल्याचा दावा केला आहे तसेच काही दिवसांपूर्वी भाजपा चे मनोज कंबोज आर्यन खान ड्रग्स केसचे मास्टर माईंड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.