Case Against Devendra Fadnavis: भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान स्वत:वर दाखल असलेल्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्या प्रकरणी त्यांच्याविरूद्धचे खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टाने फडणवीसांना 24 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाने म्हटले आहे की, "आरोपीला पुढील सुनावणीला कोर्टासमोर हजर केले पाहिजे आणि पुढच्या तारखेला कोणतीही सूट दिली जाणार नाही." फडणवीस यांनी कोर्टाकडून पुढील तारीख मागण्याची मागण्याची ही दुसरी वेळ आहे.
माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व देखरेख करण्यात व्यस्त असल्याचे फडणवीस यांचे वकील उदय डबली यांनी शुक्रवारी कोर्टाला सांगितले. डबली यांनी कोर्टाला सांगितले की याशिवाय ते अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकर्यांना भेटत आहेत जेणेकरून नुकसानीचा आढावा घेता यावा.
कोर्टाने हे निवेदन स्वीकारले आहे परंतु पुढच्या सुनावणीत फडणवीस हजर राहिले पाहिजेत असा देखील आदेश कोर्टाने दिला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतः विरोधात असलेल्या दोन खटल्यांची माहिती लपवल्याचा कथीत आरोप याचिका कर्ते वकील सतीश उके यांनी केला होता. महत्त्वाचे म्हणजे वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.