'एकनाथराव खडसे मंत्री झाले तरच जळगाव जिल्ह्याचा, खान्देशाचा विकास शक्य'-बहुजन नेते अनिल भाऊ महाजन
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

एकनाथराव खडसे मंत्री झाले तर जळगाव जिल्ह्यातील, खान्देशातील प्रत्येक नागरिक हा मंत्री असेल असे प्रतिपादन मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार तसेच ओबीसी बहुजन नेते अनिल भाऊ महाजन यांनी केले. नाथाभाऊ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्री केले तरच खान्देशचा विकास शक्य आहे, तसेच नाथाभाऊंचे राज्य मंत्री मंडळात राहणे ही खान्देशाच्या विकासासाठी काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, ‘राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत असताना जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल कारण विकासापासून वंचित जळगाव जिल्हा झालेला आहे. जिल्ह्याला पालकच कोणी उरले नाही.’

‘खान्देशचा विकास करण्यासाठी व करोडो रुपयाचा निधी खेचून आणण्यासाठी एक दमदार नेतृत्व लागते आणि ते नेतृत्व हे आज नाथाभाऊ खडसे यांच्या रूपाने आहे. तुम्हा-आम्हा सर्वांचे दुर्दैव की नाथाभाऊ हे सत्तेच्या बाहेर आहेत. त्यामुळे एकटे नाथाभाऊ थांबले नव्हे तर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचा विकास थांबला.’

‘शोषित पीडित वंचित घटकांचा आवाज सर्व बहुजन समाजाला आपलेसे करणारा नेता आज सरकारमध्ये नाही याचे प्रचंड दुःख खान्देशातील लोकांना आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय. हजारो लोकांच्या मनात नाथाभाऊंच्याबद्दल आदर आहे. त्यांच्यावर एक विश्वास आहे. याच आधारस्तंभाला  जाणीवपूर्वक खाली खेचण्याचे काम अनेक विघ्न संतुष्टी लोक करत आहेत. पण अन्याय हा जास्त दिवस जळगावकर आणि खान्देशवासीय सहन करणार नाही तुमचा आमचा सर्वांचा विकास करायचा असेल तर नाथाभाऊच्या मागे खंबीरपणे उभे राहावे लागेल आणि हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून खान्देशाच्या विकासासाठी लढा उभारावा लागेल. जेणेकरून विरोधकांना चाप बसेल आणि पक्ष नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे लक्ष वेधून जिल्ह्याच्या विकासाला साथ देण्यासाठी नाथांभाऊना राज्य सरकार मध्ये मंत्री करण्याचा विचार करावाच लागेल.’

‘खान्देशातील अभ्यासू नेतृत्व जास्त दिवस सरकारच्या बाहेर राहणे म्हणजे समाजाच कधी न भरून निघणारे खूप मोठे नुकसान होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आज ही नाथाभाऊं खडसे यांच्या प्रेमात आहेत. नाथाभाऊसाठी आजही भाजपची दारे उघडी आहेत, असे खाजगीत बोलताना भाजप नेते सांगतात. नाथाभाऊ सोबत जे घडले त्याबाबत त्यांच्यासोबत काम केलेल्या आमच्या अनेक भाजपा नेत्यांना कार्यकर्त्यांना वेदना होतात असे भाजप नेते सांगतात. परंतु खान्देश विकास पुरुष नाथाभाऊ खडसे यांनी शरदचंद्र पवार साहेबांवर विश्वास टाकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांबद्दल आदर आहे. पक्ष नेतृत्व त्यांना न्याय देईल याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे नाथाभाऊ हे विश्वासघाती राजकारणी नाहीत समोरा-समोर बोलून करणारे व्यतिमत्व आहे.’