Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

शिवसेना पक्षातील फुटीनंतर अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासबत गेले. मुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांच्या मंत्रिमंडळ आणि सरकारमध्येही हे आमदार सध्या सहभागी आहेत. असे असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या शिवसेना (UBT) पक्षाचा विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. पक्षातशिवसेना संपविण्यासाठी आणि केवळ सत्तेसाठी तिकडे गेलेल्या गद्दारांना आपल्या पक्षाची दारे नेहमी बंद असतील. काही झाले तरी त्यांना 'नो एन्ट्री' असेल, असे ते म्हणाले.

वाट चुकलेल्यांना पुन्हा प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांवर प्रहार करताना म्हटले की, अनेकांनी मी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्त्व सोडल्याची टीका आणि प्रचार केला. या प्रचारास अनेक जण भुलले आणि त्यांनी इतरांच्या पालख्या वाहात शिवसेनेशी गद्दारी केली. पण, मला वाटतं आता तुमचेही डोळे उघडले असतील, तुम्ही ज्यांच्या आहारी गेला होतात, ती शिवसेना आपली नव्हती. त्यांना बाळासाहेबच काय, हिंदूत्त्व म्हणजे काय, याचाही विचार नाही. सत्तेसाठी आणि व्यक्तिगत लाभासाठी महाराष्ट्र विकणे, स्वाभिमान विकणे हा बाळासाहेबांचा कधीही विचार नव्हता. जो गद्दारांना सूचला. त्यामुळे वाट चुकलेल्यांना आगामी काळात नक्कीच पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाईल. पण, गद्दारांना नो एन्ट्रीच असेल. (हेही वाचा, Senate Election Results Celebration at Matoshree: सिनेट निवडणुक निकालानंतर मातोश्रीवर जल्लोष; गुलालात माखले आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Watch Video))

इतरांना विनंती दीपेश म्हात्रे यांना शिक्षा

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझ्या सामान्य कार्यकर्त्यांभोवती, शिवसैनिकांवरती मोहजाळ टाकलं, त्यांना फसविण्यात आले. पण आता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. म्हणूनच ते पुन्हा एकदा परत येत आहेत. आज दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी हाच निर्णय थोडा आगोदर घेतला असता तर कल्याण डोंबिवली मध्ये वेगळे चित्र दिसले असते. तिथे मुख्यमंत्र्याचं कार्ट उभा होतं. पळताभूई थोडी झाली होती. थेट पंतप्रधानांना सभा घ्यावी लागली. कल्याण-डोंबिवलीकरांनी या ठिकाणी आपल्या सामान्य कार्यकर्तीला चार लाख मतं दिली. ठिक आहे, आपला पराभव झाला. पण खचायचे नाही. मी इतरांना विनंती करेन आणि दीपेशला शिक्षा करेन. ती शिक्षा हीच की, पहिल्यापेक्षा अधिक जोमाने काम करा. डोंबिवली आणि कल्याण हा आपला बालेकिल्ला आहे. तो कायम ठेवण्याचे आव्हान आहे. तो कायम ठेवा, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.