विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केलीय. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाबद्दल विधानं केली होती. त्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आणि मॅसेज येत आहेत. वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध व्यक्त केला होता.
पाहा पोस्ट -
Leader of Opposition in Maharashtra Assembly, Vijay Wadettiwar has written to CM Eknath Shinde demanding to increase security given to him after he received threat messages.
— ANI (@ANI) November 13, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, मागणी केलीय. सध्या वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते असल्याने वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा धमक्या मिळत असल्यानं अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक सुरक्षा देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केलीय.
याआधीही विजय वडेट्टीवार यांना धमक्या आल्या आहेत. 2017-18 मध्ये मराठा समाजाने मूक मार्चा काढत आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळीही विजय वडेट्टीवार यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, अशी वडेट्टीवारांची मागणी आहे. तर मराठा समाजाला सरकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीला विजय वडेट्टीवारांचा विरोध आहे.