Death Threat to Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी, 200 कोटी रुपयांची केली मागणी
Mukesh Ambani | (File Image)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणखी एक जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश अंबानी यांना 27 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी धमकीचा मेल आला होता. या मेलमधून मुकेश अंबानी यांना 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी अंबानींना देण्यात आली होती त्याच ईमेल आयडीवरुन पुन्हा एकदा धमकीचा मेला आला आहे. यावेळी त्या व्यक्तीने अंबानींकडे 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपये करण्यात आले. “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता 20 कोटी नाही तर 200 कोटी द्यावे लागतील. अन्यथा तुम्ही तुमच्या डेथ वॉरंटवर सही करत आहात.' असे या मेल मध्ये लिहण्यात आले आहे. (हेही वाचा - Breaking News: मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल)

मुकेश अंबानी यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा प्रभारींनी गावदेवी पोलिसांत धाव घेत आयपीसी कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर आरोपीने आणखी एक धमकीचा ईमेल केल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.