भाजप (संग्रहित प्रतिमा)

पुण्यातील (Pune) नेत्यांना धमकीचे (Threat) मेसेज आणि फोन येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका राजकीय नेत्याला धमकीचे मेसेज आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका आमदाराने पोलिसांना सांगितले आहे की त्यांना 30 लाख रुपयांच्या खंडणीचा मेसेज आला आहे, ज्यामध्ये अज्ञात आरोपींनी पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, पिंपरी चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या कार्यालयाच्या हेल्पलाइन क्रमांकावर 4 एप्रिल रोजी व्हॉट्सअॅपवरून हा संदेश आला होता. हेही वाचा Maharashtra Politics: शासन करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, ठाकरे गटाची भाजपवर टीका

पैसे न दिल्यास अज्ञात आरोपींनी डोक्यात गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खंडणी, गुन्हेगारी धमकी व इतर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आहे.