Death Threat Call To Ratan Tata: धक्कादायक, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात
Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Death Threat Call: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचे फोन सतत येत असतात. मुंबई शहर उडवण्याचे तर कधी कोणाचा घात करण्याचे, त्यामुळे मुंबई पोलिस सतत सर्तक राहून काम करते. दरम्यान पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन आला. रतन टाटा यांच्या संदर्भात फोनवर  बोलण्यात आलं. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं अनोळख्या व्यक्तीनं फोनवर धमकी दिली. या घटनेनंतर पोलिस कंट्रोल रुममध्ये मोठी खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र कामाला लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये एका अज्ञाताने धमकीचा फोन केला.  फोन केल्यानंतर पोलिसांना टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबाबत धमकी दिली. रतन टाटा यांचं नाव घेत धमकी दिली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा ते सायरस मिस्त्री होतील, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं. या घटनेनंतर पोलिस कंट्रोल रुममध्ये मोठी खळबळ उडाली, पोलिस अधिकाऱ्यांनी  सुचना देताच सर्व सुत्रे कामाला लागली. पोलिसांनी दोन पथक तयार केलं. एक पथकांनी रतन टाटा यांचे सुरक्षा वाढवली. तर दुसरी कडे फोनवर धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी तयार केलं. (हेही वाचा-अभिनेता सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये

दुसऱ्या पथकांनी धमकीचा फोन आल्यानंतर त्याला पुन्हा फोन केला परंतु फोन बंद असल्यामुळे पोलिसांनी टेलिकॉम कंपनीच्या मदतीने अज्ञाताचा शोध घेतला. त्यांच लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं त्यानंतर त्याचा पत्ता शोधला. तो पुण्याचा रहिवासी आहे असं तपासणीतून समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यात तपासणी केली आणि घर शोधलं. दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली की, धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली.

चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला की, आरोपी हा मनोरुग्ण आहे. त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून मुंंबई पोलिसांच्या कंट्रोलरुमला फोन केला. मानसिक रुग्ण असल्याने कोणतीही कारवाई करता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी  तात्काळ त्याला ताब्यात घेतले आहे.