devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

गेले अनेक दिवसांपासून राज्यात रवी राणा (Ravi Rana) विरुध्द बच्चू कडू (Bacchu Kadu) असा वाद रंगला आहे. हा वाद कधी शमणार यावर तोडगा कोण काढणार अशी चर्चा संपूर्ण राज्याच्या राजकारणात सुरु होती. तरी नुकतीच रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (DCM Devendra Fadnavis) भेट घेतली आहे. यानंतर या वादावर पर्दा पडणार का अशी चर्चा संपूर्ण राज्यात रंगली. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला (Guwahati) जाऊन शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 खोके घेतले, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला होता. यावरुन बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात निर्माण झालेला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या शिष्टाईमुळे मिटला. पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एक गौप्यस्फोट केला आहे.

 

पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यावर असे आरोप लावणे चुकीचे असल्याचे सांगितले. जे गुवाहाटीला गेले. तर इतर आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकून आले होते. बच्चू कडू यांना आपण स्वत: फोन करून आम्ही सरकार तयार करणार असून तुम्ही आमच्यासोबत हवे आहात, असे सांगितले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी गुवाहाटी गाठले. त्यांच्यावर खोके घेतल्याचे आरोप करणे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (हे ही वाचा:- Maharashtra Politics: शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ तर मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय)

 

तरी देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर बच्चू कडू आणि रवी राणा काय प्रतिक्रीया देणार यावर सर्वाचं लक्ष लागलं आहे. बच्चू कडू यांनी शिंदे गटात जाण्यासाठी कोणाशी सौदा केला, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांबद्दल मला ठाऊक नाही, पण याचा अर्थ त्यांनी पैसे घेतलेत, असा होत नाही.