Representational Image (Photo Credits: Pixabay)

दहिसर (Dahisar) मध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून घरात किचनमध्येच त्याचा मृतदेह गाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये महिलेला अटक झाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मृत व्यक्तीच्या 6 वर्षांच्या चिमुकलीने या प्रकराची माहिती कुटुंबाला दिली तेव्हा त्यावरून तक्रार नोंदवून महिलेला अटक करण्यात आली आहे. तर प्रियकर लंपास आहे. (नक्की वाचा: Mumbai Murder Case: वांद्रे परिसरात 21 वर्षीय तरूणाकडून प्रेयसीची हत्या; खोट्या बलात्काराच्या आरोपांना, दीड लाख रूपयांच्या मागणीतून उचललं टोकाचं पाऊल).

FPJ रिपोट्सनुसार, मृत व्यक्तीचं नाव रईस शेख आहे तो 28 वर्षीय होता. त्याचा खून 27 वर्षीय पत्नी शहिदाने केला. मागील महिन्यात हा खून झाला असून रईसचा मृतदेह एका गनी बॅगमध्ये भरून त्यांनी घरातच स्वयंपाकगृहामध्ये तो गाडला, त्यावर टाईल्स लावल्या. या प्रकारानंतर शहिदाचा प्रियकर अमित विश्वकर्मा पसार झाला आहे तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. दरम्यान पोलिसांनी आता रईसचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याच्या खूनाचा आरोप असलेल्या पत्नीलाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा विवाह 2012 साली होता त्यांना 2 मुलं होती. दहिसरच्या रावळपाडा खान कम्पाऊंड मधील चाळीमध्ये ते राहत होते. रईस गारमेंट शॉप मध्ये काम करत होता. दरम्यान शहिदाचे त्यांच्या घराजवळ राहणार्‍या अमित सोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यांना एकत्र यायचं होतं पण त्यांच्या नात्यामधील अडसर असणारा रईस याचा खेळ कायमचा खल्लास करण्यासाठी त्यांनी हा खून केल्याचा अंदाज आहे.

20 मेच्या रात्री जेव्हा मुलं झोपली होती तेव्हा शहिदा आणि अमितने रईसचा गळा एका नायलॉनच्या दोरीने घोटला. त्याला गनी बॅग मध्ये भरलं आणि शहिदाच्या स्वयंपाक घरातच त्याला पुरलं. नंतर संशय टाळण्यासाठी या जागेवर त्यांनी नव्या टाईल्सदेखील लावल्या. अमित यानंतर गायब झाला आहे. शहिदाने यानंतर दहिसर पोलिस स्थानकामध्ये तक्रार देखील नोंदवली.

शहिदाने नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तिने रईस 20 मे पासून कामावरून घरी आलेला नाही. पोलिसांनी आजुबाजूला थोडी चौकशी केल्यानंतर तिचे अमित सोबत असलेल्या संबंधांची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांना अमित सापडला नाही. मग त्यांनी शहिदा आणि तिच्या मुलांची देखील चौकशी केली आहे. मंगळवारी या पोलिस तपासामध्ये त्यांचं नव्याने असलेल्या टाईल्सवर लक्ष गेले आणि रईसचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शहिदाची चौकशी केली तेव्हा तिने देखील या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र अद्यापही अमितचा शोध सुरू आहे.