महाराष्ट्रासह जगभरात अद्यापही कोविड 19 चं संकट पूर्णपणे शमलेले नाही. राज्यात सध्या कोविड 19 च्या संसर्गावर नियंत्रण असले तरीही आज झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये आगामी दहीहंडी सेलिब्रेशन (Dahi Handi Celebration) वर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई मध्ये आज राज्यातील गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यंदा छोट्या स्वरूपात उत्सवाला परवानगी मिळावी अशी गोविंदा पथकांची मागणी होती.
दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे. यावेळेस यंत्रणांवरील ताण पाहता गोविंदा पथकांवर लक्ष ठेवता येऊ शकत नाही. परवानगी देऊन कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुन्हा लॉकडाऊनचा इशारा; पहा काय म्हणाले.
गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाचे सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या. pic.twitter.com/bJcmZiWain
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 23, 2021
महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे जीव वाचविण्यासाठी आपण सण समारंभ, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊन, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
आज गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला.