कल्याण- डोंबिवली येथील उपहारगृहांमध्ये अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान! तुमच्या परिसरातील जवळजवळ 450 उपहार गृहांमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्यालगच्या खाद्य पदार्थ्यांच्या गाड्या किंवा हॉटेलांमध्ये घरगुती गॅसचा कशाही पद्धतीने उपयोग केला जात आहे. त्यामुळे भितीदायक असणाऱ्या सिलिंडर पासून जरा तुम्ही लांबच राहा.

कल्याणच्या बेतूरकरपाडा परिसरात एका चायनीज हॉटेलला नोव्हेंबरमध्ये आग लागली होती. त्यावेळी आग विझवताना सिलिंडरचा स्फोट झाला होता. यामध्ये एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यूसुद्धा झाला होता. त्यानंतर पुन्हा 21 डिसेंबर रोजी कल्याणमधील योगिधाम येथे सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेनंतर पालिकेने कल्याण- डोंबिवली मधील रेस्टॉरंट, खानावळ, चायनीज गाड्या यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

महापालिकेने सुरु केलेल्या तपासणी दरम्यान, 45 घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. तर हॉटेल मालकांना कमर्शिअल सिलिंडर वापरणे बंधनकारक आहे.