महाराष्ट्रामध्ये आज कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आदळल्यानंतर त्याचे परिणाम आजुबाजूच्या भागात दिसत आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या (Nisarga Cyclone) पार्श्वभूमीवर आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) या वादळच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच आज काही वेळापूर्वी 5033 हे बंगळूरू- मुंबई FedEx मालवाहू विमान घसरलं आहे. दरम्यान या घटनेनंतर कोणतेही नुकसान झालेले नाही. रनवेचे देखील नुकसान झालेले नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात आज पासून कोरोना व्हायरस संकटामध्ये अनलॉक 1 ची सुरूवात होणार होती. मागील काही महिन्यांपासून ठप्प पडलेली देशांर्गत विमानसेवा सुरू झाली झाली होती. मात्र आता मुंबई, ठाण्याला असणार्या निसर्ग चक्रीवादळाचा आणि अतिवृष्टीचा धोका पाहता आता विमान सेवा बंद ठेवली जाणार आहे.
ANI Tweet
The airport witnessed a runway excursion earlier today with Fed Ex flight 5033 arriving from Bengaluru. The aircraft was towed away from the runway, no disruption caused: PRO, Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai
— ANI (@ANI) June 3, 2020
मुंबई विमानतळावरून आज दुपारी 2.30 ते 7 दरम्यान विमानतळ बंद ठेवले जाणार आहे. आज इंडिगो, विस्तारा एअरलाईन्सची विमानं रद्द करण्यात आली होती. आज दुपारी निसर्गचक्रीवादळ रायगडजवळ किनारपट्टीवर धडकलं आहे. त्यानंतर पुढील काही तास त्याचा परिणाम मुंबई, ठाण्यात दिसू शकतो. काही ठिकाणी पाऊस आणि वारा जोरदार वाहण्याची शक्यता आहे.