Mumbai Cyber Crime: मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये 3,668 घटना; 1,000 घटना Online आणि Credit Card Fraud संंबंधीत
Representational Image (Photo Credit: PTI)

मुंबई शहरात सायबर (Mumbai Cyber Crime) गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने (Mumbai Police's Cyber Crime Wing ) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत 3,668 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,073 घटना बँक खात्यांमध्ये ऑनलाइन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक झाल्याच्या आहेत. आतापर्यंत 3,668 पैकी 214 गुन्ह्यांमध्ये 334 लोकांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या मुंबईची लोकसंख्या दोन कोटींहून अधिक आहे आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी कॉन्स्टेबलसह 220 पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, एकूण प्रकरणांपैकी, 299 प्रकरणे अश्लील ईमेल किंवा एमएमएस पोस्टशी संबंधित होती. ज्यात 94 लोकांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर फेक प्रोफाइल किंवा मॉर्फिंग ई-मेलसाठी, 108 प्रकरणे नोंदवली गेली आणि 25 लोकांना अटक करण्यात आली. क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित 1,073 प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यामध्ये 16 जणांना अटक करण्यात आली. तसेच, फसवणुकीच्या 1,141 प्रकरणे नोंदवले गेले ज्यात 41 जणांना अटक करण्यात आली,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, कॉम्प्युटर सोर्स कोडशी छेडछाड केल्याची सात प्रकरणे, फिशिंग किंवा स्पूफिंग मेलची 31 प्रकरणे, पोर्नोग्राफीची 22 प्रकरणे, हॅकिंगची 46 प्रकरणे, गिफ्ट फ्रॉडची 66 आणि खरेदी फसवणुकीची 154 प्रकरणेही पुढे आली आहेत. नोकरीत फसवणूक 85, 16 विमा फसवणूक, चार प्रवेश फसवणूक, 47 बनावट वेबसाइट, 27 विवाह फसवणूक, 16 क्रिप्टो करन्सी फसवणूक, 96 कर्ज फसवणूक 96, 143 डेटा चोरी, 65 सेक्सटोर्शन यासह इतर 85 गुन्हे सायबरने नोंदवले आहेत.