प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Mumbai Airport) सीमा शुल्क विभागाने 4712 ग्रॅम सोने जप्त (Gold Seize) केले आहे.  अवैध तस्करीप्रकरणी 3 जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. झडती दरम्यान, खास डिझाइन केलेल्या अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले 1872 ग्रॅम सोने आणि फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये लपवून ठेवलेले 2840 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोन्याच्या तस्करीच्या या दोन गुन्ह्यांमध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही लोक विमानतळावरून अवैधरित्या सोन्याची तस्करी करणार आहेत. माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तस्करांना पकडण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान त्यांना काही लोकांवर संशय आला. या लोकांकडून झडती घेतली असता अवैध सोने जप्त करण्यात आले. हेही वाचा Mumbai Air Quality: मुंबई शहराची हवेची गुणवत्ता कमालीची घसरली, अनेक मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला परिणाम

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चतुराईने सोन्याची तस्करी करण्याची योजना आखली होती. यापैकी एका प्रकरणात आरोपींनी सोन्याच्या अवैध तस्करीसाठी खास अंडरगारमेंट्स तयार केल्या होत्या. झडतीदरम्यान आरोपीच्या अंतर्वस्त्रातून 1872 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. याशिवाय, आणखी एका प्रकरणात एक व्यक्ती फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये 2840 ग्रॅम सोने लपवण्याचा प्रयत्न करत होता.

सर्च ऑपरेशन दरम्यान अधिकाऱ्यांनी फ्लाइटच्या टॉयलेटमधून सोने जप्त केले. सोने तस्करीच्या या दोन्ही प्रकरणात सीमाशुल्क विभागाने एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी करून पुढील तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा देशातील सहावी Vande Bharat Train बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावणार, PM Narendra Modi 11 डिसेंबर रोजी करणार उद्घाटन

उल्लेखनीय आहे की, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एकाच दिवसात 61 किलो सोने जप्त केले होते, ज्याचे बाजारमूल्य 32 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. सीमाशुल्क विभागाने 11 नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन महिलांसह सात जणांना अटक केली होती. मुंबई विमानतळ सीमाशुल्काच्या इतिहासातील एका दिवसातील ही सर्वात मोठी जप्ती आहे.