Curfew representative Image (PC - Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पसरवलेले जाळे हळूहळू कमी होताना दिसत आहे.

राज्यात कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. अशातच काही धार्मिळ सोहळ्यांमुळे हे प्रमाण पुन्हा वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीत (Alandi) येत्या 6 डिसेंबरपासून संचारबंदी (Curfew) लागू करण्यात येणार आहे. येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी आणि 13 संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी याचदरम्यान आळंदीत खूप मोठा संजीवनी समाधी सोहळा होतो. यादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी 4 ते 5 लाखांहून अधिक वारकरी येतात. हिच संख्या यंदाही कायम राहिली तरी कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 6 ते 14 डिसेंबरदरम्यान आळंदीत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- Maharashtra: राज्यात येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन

तसेच यंदाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या सप्ताहासाठी केवळ 20 ते 50 वारक-यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे यंदाचा हा भव्यदिव्य संजीवन समाधी सोहळा अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच येथील नागरिकांनी आणि भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल (4 डिसेंबर) दिवसभरात 6776 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर काल नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 47,599 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राज्यात 83,859 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.