छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन (Chhatrapati Shivaji Terminus) बाहेर झालेल्या पादचारी पूलाच्या दुर्घटनेमध्ये सहा सामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. तर 36 नागरिक रूग्णालयात उपचार घेत आहेत. या दुर्घटनेबाबत आझाद मैदान पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत घटनेला जबाबदार कोण? याचा तपास संध्याकाळ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिला आहे. दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मनपा एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असताना विरोधकांनी आणि अनेक मुंबईकरांनी संपाप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यामातून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेमंत्री चौकशीची टिमकी वाजवणार आणि जबाबदारी झटकणार- राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन संतप्त प्रतिक्रीया
Nw some small officers will b sacked or targeted n sum enquiry will b named just like Kamala mills,elphiston bridge or ghatkopar building crash..
This time..
Sack the BMC chief?
Ask the useless Mayor to resign?
Where is the accountability?!
Walk the talk or just talk once again?
— nitesh rane (@NiteshNRane) March 15, 2019
Nw some small officers will b sacked or targeted n sum enquiry will b named just like Kamala mills,elphiston bridge or ghatkopar building crash..
This time..
Sack the BMC chief?
Ask the useless Mayor to resign?
Where is the accountability?!
Walk the talk or just talk once again?
— nitesh rane (@NiteshNRane) March 15, 2019
गुरूवारी रात्री नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. त्यावेळेस पालिकेने पेंग्विन गोंजरणयापेक्षा आणि नाईट लाईफ़बाबत चर्चा करण्यापेक्षा सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असे सांगत शिवसेना आणि पालिका प्रशासनावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये या आधी झालेल्या हल्ल्याप्रमाणे आता सीएसएमटी परिसरातील पादचारी पूल दुर्घटना आहे का? एखादा लहान अधिकारी टार्गेट केला जाईल, चौकशी समिती बसवली जाईल, पण पालिका प्रमुख, महापौर राजीनामा देणार का? जबाबदारी कोण स्वीकारणार असे प्र्श्न विचारले आहेत.
काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफ़ सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. त्यापूर्वी राणीच्या बागेत मुंबई पालिकेने पेंग्विन आणले आहेत. यावरून अनेकदा नितेश राणेंनी शिवसेनेला टार्गेट केले आहे.