Mumbai Airport (PC - Wikimedia commons)

मुंबई शहरामधील Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) 8 मे दिवशी पावसाळ्यापूर्वी देखभालीच्या कामासाठी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. या वेळी रनवे च्या देखभाल-दुरूस्तीचं काम केलं जाणार असल्याची माहिती private airport operator MIAL कडून देण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) ने असेही म्हटले आहे की सर्व स्टेकहोल्डर्सना सूचित करण्यासाठी सहा महिने आधीच अनिवार्य NOTAM (विमानचालकांना सूचना) जारी करण्यात आली होती, ज्यामुळे विमान कंपन्या त्यांचे उड्डाण वेळापत्रक वेळेपूर्वीच तयार करू शकतील आणि त्यानुसार नियोजन करू शकणार आहेत.

MIAL च्या माहितीनुसार, 09/27 आणि 14/32 या दोन्ही धावपट्ट्यांवर मान्सूनपूर्व देखभालीचे काम सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत केले जाईल. या कालावधीत प्राथमिक धावपट्टी 09/27आणि दुय्यम धावपट्टी 14/32 दोन्ही तात्पुरते बंद राहतील, असे त्यात म्हटले आहे. विमानतळाच्या हवाई पायाभूत सुविधांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य जपण्यासाठी ही वार्षिक मान्सूनपूर्व देखभाल अत्यंत महत्त्वाची असते आणि ती दरवर्षी केली जाते.

MIAL मान्सून हंगामात सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफ सुनिश्चित करण्यासाठी पाणी साचू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी, विशेषज्ञ धावपट्टीच्या पृष्ठभागाची तपासणी करणार आहेत. नक्की वाचा:  मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘फास्टॅग कार पार्क’ लाँच.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार असल्याने सुमारे 200 विमानं प्रभावित होण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर दररोज सुमारे 950 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीची ये-जा असते. विमानतळ प्रशासनाचा दावा आहे की त्यांच्यातील समन्वयामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही. प्रवाशांना सुरळीत आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल.