Supriya Sule | Twitter

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) केली आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) बदल्या सातत्याने केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करु दिलं जात नाही असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. (हेही वाचा - Supriya Sule on LS Seat Sharing Formula: महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 8-10 दिवसात होईल जाहीर)

पाहा पोस्ट -

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे. “15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवं विधेयक मांडलं आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलं आहे. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. अनेक महिन्यांपूर्वीच हा फॉर्म्युला दिल्लीत ठरला आहे. आमचा जागावाटपाचा निर्णय लवकरच होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.