दक्षिण मुंबई (South Mumbai) मधील क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) परिसरातील एका 4 मजली इमारतीचा वरील भाग कोसळल्याचे वृत्त समोर येत आहे. लोकमान्य टिळक मार्गा (Lokmanya Tilak Marg) वरील ही इमारत आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात पथकातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने सध्या बचावकारीला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच काही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याचे सुद्धा समजत आहे. याबाबत मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, इमारतही आधीपासूनच रिकामी असल्याने याठिकाणी कोणीही आत अडकून पडलेले नाही.
यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी देखील क्रॉफर्ड मार्केट येथील मंगलदास रोड वरील लोहार चाळ जवळच्या युसूफ बिल्डिंगचा देखील काही भाग कोसळला होता. संबंधित इमारत ही म्हाडाची उपकर प्राप्त वास्तू होती, वारंवार समोर येणाऱ्या अशा प्रसंगांमुळे इमारतींचे बांधकाम असुरक्षित असूननागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे म्हंटले जात आहे.
ANI ट्विट
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) PRO: No person is trapped as the building was already vacated. https://t.co/LZanCbLK0M
— ANI (@ANI) September 20, 2019
दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट हा दक्षिण मुंबईतील जुना परिसर असल्याने याठिकाणी अनेक जुन्या वास्तू आहेत. या वस्तूंची डागडुजी न झाल्याने व कालानुरूप बांधकाम ढिसाळ झाल्याने यापूर्वी देखील अनेकदा अशाप्रकारे इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळल्याचे अनेक प्रसंग समोर आले होते.