महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Maharashtra) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), ठाणे (Thane), दादर (Dadar), कल्याण (kalyan) रेल्वे स्थानकावरील माहिती केंद्रात प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. मुंबईत आज सकाळी कोरोना व्हायसची लागण होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. यामुळे मुंबईतील लोक अधिक घाबरले आहेत. तसेच सीएसएमटी, ठाणे , दादर आणि कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवासादरम्यान, बाधित असलेल्या व्यक्तीकडून अनेक लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळेच या स्थानकावर कोरोनाची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत जगभरात 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. आता भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. यात मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेतून प्रवास करतात. याशिवाय सीएसएमटी, ठाणे, दादर, कल्याण या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महत्वाचे म्हणजे, बाधित असलेल्या रुग्णाने रेल्वेतून प्रवास केला तर, मोठ्या संख्येत लोकांना याची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने वरील रेल्वेस्थानकावर प्रवाशांची थर्मोमीटर द्वारा चाचणी करण्याची योजना आखली आहे. हे देखील वाचा- Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राम कदम, पंकजा मुंडे या राजकीय नेत्यांचा Lockdown चा सल्ला

मध्य रेल्वेचे ट्विट-

महाराष्ट्रात सध्या 39 कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. यवतमाळमध्ये 3 नवी मुंबई 3 मध्ये 1, पिंपरी चिंचवड मध्ये 9, पुणे मध्ये 7, मुंबई मध्ये 6, नागपूर मध्ये 4, कल्याणमध्ये 3, औरंगाबाद व अहमदनगर, रायगड, ठाणे मध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आहेत. कोरोना व्हायरसग्रस्तांची पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती संख्या पाहता आता नागरिकांना आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान या स्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आगामी तीन दिवसांसाठी पुणे शहरातील सारे बाजार व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 17,18,19 मार्च या तीन दिवसांसाठी घाऊक आणि किरकोळ व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सुमारे 40 हजार दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये किराणा माल आणि मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश नसेल.