Covid Helpline Numbers for Mumbai Police Personnel | (Photo Credit: Archived, Edited, Symbolic Images)

कोविड-19 (Covid-19) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) या कठीण काळात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेले मुंबई पोलिस (Mumbai Police) देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर्स (Helpline Numbers) जारी केले आहेत. कोरोना व्हायरस संबंधित माहिती हवी असल्यास किंवा प्रश्न, समस्या असल्यास अथवा मदत हवी असल्यास मुंबई पोलीसचे कोरोनायोद्धा या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. या हेल्पलाईन क्रमांकावर डॉक्टर आणि पोलिसांचा संघ 24 तास संपर्कासाठी सक्रिय असणार आहे.

हेल्पलाईन क्रमाकांवर उपलब्ध असलेली सोय:

# कोविड-19 तपसाणी संबंधित अचूक मार्गदर्शन.

# कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना निवासस्थानापासून रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर पर्यंतची सोय.

# प्रत्येक परिमंडळात 24 तास रुग्णवाहिका तसंच तात्काळ सेवेसाठी कार्डीएक रुग्णवाहिका उपलब्ध.

# विशेष म्हणजे या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेश आणि मार्गदर्शन मिळेल.

# गंभीर रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याची सोय देखील या क्रमांकांवर कॉल केल्यास उपलब्ध होईल.

संपूर्ण मुंबईला सुरक्षित ठेवणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक 24 तास सक्रिय आहेत. कोरोनाव्हायरस संबंधित समस्या, प्रश्न असल्यास किंवा मदत हवी असल्यास मुंबई पोलीसचे कोरोनायोद्धा या क्रमांकांवर संपर्क साधा असे आवाहन करत मुंबई पोलिसांनी तीन हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. ते नंबर्स पुढील प्रमाणे आहेत- 913777100, 9321262100, 9321263100. (मुंबई पोलिस दलातील 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण; SRPF चे 82 जवान Covid-19 बाधित)

Mumbai Police Tweet:

दरम्यान  मुंबई पोलिस दलातील तब्बल 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर मुंबईत तैनात SRPF च्या 82 जणांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस बाधित पोलिसांना योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळतील याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.