राज्यात वाढत असलेला कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्ग पाहता तिसऱ्या लाटेची भीती नाकारता येत नाही. बॉलिवूडमधील अनेक मंडळींना कोरोनाची लागण झाली असून, आता अनेक लोकप्रतिनिधीदेखील या विषाणूच्या कचाट्यात अडकले आहेत. राज्यातील 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोना झाला आहे. याशिवाय युवासेना सचिव वरुण देसाई आणि आमदार प्रताप सरनाईक यांनाही कोरोना झाला आहे.
म्हणजेच गेल्या चोवीस तासांत शिवसेनेचे चार बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. म्हणजेच मंत्रिमंडळातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचीही नावे आहेत. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घर आणि कार्यालय 'शिवतीर्थ'मध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत नियमित बैठक होत आहे. सध्या महाराष्ट्रामधील परिस्थिती स्फोटक आहे, त्यामुळे निर्बंध कडक केले आहे. मात्र सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊनचा विचार नाही. तशी परिस्थिती उद्भवलीच तर आपली इतर तयारी आहे. (हेही वाचा: 66 प्रवाशांना Covid-19 ची लागण झाल्यानंतर Cordelia Cruise गोव्यावरून मुंबईला परत; BMC करणार सर्वांची चाचणी)
कोरोनाची लागण झालेले काही नेतेमंडळी-
केसी पाडवी, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, राधाकृष्णविखे पाटील, सुप्रिया सुळे, दीपक सावंत, चंद्रकांत पाटील, इंद्रनील नाईक, हर्षवर्धन पाटील, विपिन शर्मा, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, वरुण सरदेसाई, सुजय विखे पाटील,