Coronavirus Cases In Maharashtra: राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या आजही 20 हजारांच्या पार; 13,234  जणांना डिस्चार्ज
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची आकडेवारी आता प्रतिदिन सरासरी 20,000 राहू लागली आहे. आजही राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित 20,131 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना संक्रमित असलेल्या परंतू, उपचार घेऊन बरे वाटू लागल्याने 13,234 जणांना रुग्णायातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला. राज्यात आज दिवसभरात कोरना व्हायरस संक्रमित 380 जणांचा मृत्यू झाला. (Coronavirus Cases In Maharashtra) राज्याच्या आरोग्य विभागाने (Public Health Department, Maharashtra) याबाबत माहिती दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 9,43,772 इतकी झाली आहे. यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) मिळालेल्या 6,72,556 जणांसह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 27,407 रुग्णांचाही समावेश आहे. राज्यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 2,43,446 इतकी आहे. (हेही वाचा, Coronavirus in Pune: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत पुणे देशात सर्वोच्च; जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक COVID-19 रुग्ण, Recovery Rate 78 टक्क्यांवर)

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर 2.9% इतका आहे. कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या व्यक्तिंची तपासणी करण्यासाठी राज्यात आतापर्यंत 47,89,682 चाचण्या घेण्यात आल्या. एकूण चाचण्यांपैकी 9,43,772 जणांचे अहवाल कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आले. राज्यातील कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटीव्ह येण्याची संख्या 19.7% इतकी आहे. राज्यात आजघडीला 15,57,305 नागरिक होम क्वारंटाइन आहेत. तर 38,141 लोक संस्थांत्मक क्वारंटाईनही असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागने म्हटले आहे.