Coronavirus in Mumbai | (Photo credit: archived, edited, symbolic images from Pixabay))

मुंबई ( Mumbai) शहरातील भाटीया रुग्णालय (Bhatia Hospital) कर्मचारी आणि डॉक्टर अशा एकूण 6 जणांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या सर्व कर्चाऱ्यांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU Care) मध्ये उपचार सुरु आहेत. सर्वजणांची प्रकृती स्थिर असून उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे वृत्त रुग्णालय प्रशासनाच्या हव्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. गेल्या काही काळात डॉक्टर, पोलीस आणि पत्रकारांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह येत आहे.

शेवटची अद्ययावत आकडेवारी हाती आली तेव्हा महाराष्ट्रातील कोरना रुग्णांची संख्या 5229 इतकी होती. यात गेल्या 24 तासात आढळलेल्या 553 कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 251 इतकी झाली आहे. गेल्या चोविस तासात 19 कोरोना व्हायरस बाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. (हेही वाचा, Coronavirus रुग्णसंख्या: महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग, सकाळी 10 वाजेपर्यंतची MEDD द्वारा प्राप्त आकडेवारी)

एएनआय ट्विट

कोरोना व्हायरस संकटाच्या बाबतीत विचार करायचे देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हॉटस्पॉट ठरला आहे. महाराष्ट्रातील कोविड 19 बाधित रुग्णांचा आकडा देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रासोबत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे. गेल्या 24 तासात देशात 1383 नवे रुग्ण आढळले. तर, कोरोना बाधित 50 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19,984 इतकी झाली आहे. त्यातील 3870 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 640 जणांचा मृत्यू झाला आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.