Coronavirus: 'आज आहे गुढी पाडवा, कोरोना ला आडवा...' मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली भन्नाट कविता
Ramdas Athawale (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) आतापर्यंत 123 रुग्ण सापडले असून सध्या सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय काळजी घेतली जावी याचे संदेश व्हायरल होत आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची गो कोरोनाच्या घोषणा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज गुढीपाडवाच्या निमित्ताने रामदास आठवले यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आणखी एक भन्नाट कविता शेअर केली आहे. रामदास आठवले यांना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी गुढीपाडव्याच्याही त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात गुढीपाढवा मराठी नूतन वर्ष म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सुरुवातील केरळ येथे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यानंतर भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने 600 चा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दुपारपर्यंत 116 होती. मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे नागरिक घाबरले; नागपूर येथे चीनी व्यक्ती आढळताच केले पोलिसांच्या स्वाधीन

रामदास आठवले यांचे ट्वीट-

रामदास आठवले यांची लॉकडॉऊनवर कविता-

कोरोना आला आहे आपल्या दारी

आपण थांबा आपल्या घरी

आता करू नका कोणी पंढरीची वारी

नरेंद्र मोदींचा लॉक डाऊन निर्णय आहे लय भारी

नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश पाळा

घराच्या बाहेर जाणे टाळा

कोरोना व्हायरस ला घाला आळा

कोरोनाला दिसेल तिथे जाळा

जान है तो जहान है

लाईफ अपना महान है

रामदास आठवले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गो कोरोना गो अशा घोषणा दिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. दरम्यान ट्रोल करणाऱ्यांना रामदास आठवले यांनी आपल्या स्टाईलमध्ये खडेबोल सुनावले होते. भारतात भयंकर आजार दाखल झाला असताना कोरोना गो नव्हेतर कोरोना या असे म्हणणार का? कोरोना कम मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असेच मी म्हणेन. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. करोना गो म्हणजे करोनाने येथून जावे अशी माझी भूमिका आहे. करोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावे, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.