क्वारंटाईन असताना पळालेल्या एका कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णाला रत्नागिरी पोलिसंनी दम वैगेरे न देता प्रेमाने समजावले व त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. रत्नागिरी पोलिसांनी आपल्या @RatnagiriPolice या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. मात्र, रत्नागिरी पोलीस (Ratnagiri Police) 'रुग्णाला दम वैगेरे न देता प्रेमाने समजावले' असे ट्विट करुन का सांगात आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या ट्विटनुसार हा रुग्ण मुंबई येथून आला होता. त्याला गावातीलच शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.
रत्नागिरी पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''DySp. प्रवीण पाटील साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिस स्टेशनचे API सुनील पवार, PSI कदम व पोलिस मित्राच्या पथकाने पळालेला करोना पॉझिटिव्ह रुग्णाला दम वगैरे न देता प्रेमाने समजावले व दाभोळ कोळथरे येथुन पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवले.''
रत्नागिरी पोलीस ट्विट
DySp. प्रवीण पाटील साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिस स्टेशनचे API सुनील पवार, PSI कदम व पोलिस मित्राच्या पथकाने पळालेला करोना पॉझिटिव्ह रुग्णाला दम वगैरे न देता प्रेमाने समजावले व दाभोळ कोळथरे येथुन पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवले pic.twitter.com/qVU4E6L2PX
— Ratnagiri Police (@RatnagiriPolice) May 14, 2020
रत्नागिरी पोलिसांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''सदर रुग्ण मुंबई येथून आल्याने गावात असलेल्या शाळेत केलं होत क्वॉरंटाईन. एकूण चार रुग्ण सापडले होते. त्यातील एक पळून गेल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती.'' (हही वाचा, Coronavirus: 'काही टेंशन घेऊ नको रे, मित्रा!' Corona Warrior परत आलायं; COVID-19 संक्रमित मुंबई पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त)
रत्नागिरी पोलीस ट्विट
सदर रुग्ण मुंबई येथून आल्याने गावात असलेल्या शाळेत केलं होत क्वॉरंटाईन
ऐकुन चार रुग्ण सापडले होते त्यातील ऐक पळून गेल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती
— Ratnagiri Police (@RatnagiriPolice) May 14, 2020
महाराष्ट्र पोलीस दलातील बरेच कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमनापासून दूर ठेवण्यासाठी आणि लॉकडाऊन नियमांचे पालन व्हावे यासाठी महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. यात पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. दाटीवाटीची लोकवस्ती, दमट हवामान, छोट्या घरांमध्ये राहणाऱ्यांची मोठी संख्या आदींमुळे नागरिकी घराबाहेर पडत आहेत. बाजारात गर्दी करत आहेत. अशा वेळी पोलिसांना गर्दीत जाऊन काम करावे लागते आहे.