
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच फ्रंटलाइन वर्कर्समध्ये मोडणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमधील गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाला एकतरी जणाचा मृत्यू होत असल्याची बाब अधिकृत डेटा मधून समोर आली आहे. तर गेल्या 16 दिवसांत पोलीस विभागातील 25 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याने आकडा बुधवार पर्यंत 389 वर पोहचला आहे. या 25 मृतांपैकी चार जण हे उस्मानाबाद, तीन जण हे परभवणी आणि मुंबई, दोन जण नाशिक शहर आणि प्रत्येकी एक जण हा नवी मुंबई, पुणे शहर, नागपूर, नंदूरबार जिल्हा, बीड, नांदेड, धुळे, लातूर, पुणे रेल्पे पोलीस आणि महाराष्ट्र सायबर सेलमधील आहे. मृतांमधील तीन जण हे एसआरपीएफ, एकजण जीआर (ग्रुप) 3 जालना, जीआर 6 (धुळे) आणि जीआर 12एफ (हिंगोली) मधील आहे.
तर एप्रिल 14 नंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन बद्दल डीजीपी संजय पांडे यांनी असे म्हटले की, ज्यांचे वय 50 किंवा त्याहून अधिक असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे. तसेच ही सूचना सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली गेली आहे. राज्यातील पोलीस दलातील 80 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला गेला आहे. तसेच 40 टक्के कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.(Rajesh Tope on Oxygen Supply: केंद्राने ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा- राजेश टोपे)
दरम्यान, 6 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 364 जणांना मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हाच आकडा 21 एप्रिल पर्यंत 389 वर जाऊन पोहचला. या परिस्थितीत मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मृतांचा आकडा 103 असून त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. ठाणे मध्ये 34 जण, नागपूर (21), पुणे (13),नवी मुंबई (12), नाशिक ग्रामीण (10) आणि नाशिक शहर (11) जणांचा मृत्यू झाला आहे.