कोरोना व्हायरसमुळे भारतात तीसरा बळी, सौदी अरेबिया येथून आलेल्या 71 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Coronavirus in India (Photo Credits: IANS) Representational Image

सौदी अरेबिया येथून परतलेल्या 71 वर्षीय वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर हा व्यक्ती महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील असून शनिवारी दुपारच्या वेळेस त्याचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने असे सांगितले आहे की, वृद्धाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सिव्हील सर्जन प्रेमचंद पंडित यांनी असे सांगितले की, काही दिवसांपूर्वीच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याच्या कारणाने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शनिवारी सकाळी कोरोना व्हायरसची लक्षणे समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जनरल रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नमून परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दुपारी चार वाजल्याच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र आता रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे. तर राज्यात कोरोना संक्रमणाची वाढती प्रकरणे पाहता सरकारने सर्व शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली आहे. तर या शाळा-महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी दिल्लीत एका महिलेचा शुक्रवारी मृत्यू आणि कर्नाटकात सुद्धा 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे तीसरा बळी गेला आहे.(कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर) 

दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसबाबत एक पुन्हा पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पिंपरी, चिंचवड आणि पुण्यातील शाळांना सुट्टी जाहिर केली होती. तसेच सिनेमागृह, जिम, नाट्यगृह, स्विमिंग पूल बंद ठेवण्यात यावे असा निर्णय दिला होता. रेल्वे आणि बस सेवा बंद करणे अशक्य असून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावे. कोणत्याही कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी देण्यात येणार नाही. राज्यातील खासगी क्षेत्रातील मालकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा द्यावी असे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून आलेले रुग्ण होते.