राज्यात कोरोना व्हायरसचा धोका पाहता रविवारी जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर संध्याकाळ पासून पोलिसांकडून कलम 144 मुंबईत लागू करण्यात आला होता. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 75 वर पोहचला आहे. दुसऱ्या बाजूला राज्यासह मुंबईत सुद्धा आता फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. येत्या 31 मार्च पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. याच कारणामुळे वृत्तपत्र घरी येणार नाही आहे.मुंबईत अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. त्यानुसार खाद्यपदार्थ, दूध, हॉस्पिटल, मेडिकल्स, टेलिफोन, इंटरनेट सर्विस, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल पंप यासारख्या महत्वाच्या सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईत छपाई सेवा सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे वृत्तपत्र घरोघरी येणार नाही आहे. तर नाशिक येथे सुद्धा कोरोना व्हायरसमुळे नोटा छपाई प्रेस येत्या 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरामध्ये रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार्यांना आता बससेवेचा फायदा घेता येणार आहे.(Coronavirus: टाळ्या, थाळ्ंयांच्या गजरात महाराष्ट्राचा 'इटली' होऊ नये, म्हणून घरातच बसा- सामना)
तर अत्यावश्यक सेवामध्ये भाजीपाला, किराणा माल दुकानं, मेडिकल स्टोअर्स, आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक आणि शेअर बाजार खुला राहणार आहेत. मात्र इतर खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देताना सरकारी कर्मचार्यांनी केवळ 5% उपस्थितीमध्ये कार्यालयं सुरू ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.