Coronavirus Outbreak | Photo Credits: IANS

महाराष्ट्रात आज (27 मार्च) सांगलीमध्ये 12 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 147 वर पोहचला आहे. दरम्यान हे चित्र भीतीदायक असलं तरीही प्रशासनाला याचा अंदाज होता. कारण सांगलीतील इस्लामपूर भागात यापूर्वी सौदी अरेबियामधून आलेल्यांच्या कुटुंबातीलच हे 12 जण आहेत. यापूर्वी 4 जणांचा रिपोर्ट 23 मार्च दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.  19 मार्च पासून हे रूग्ण मिरज येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यापैकी चारही जणांचा परदेश दौर्‍याचा इतिहास आहे. सध्या सार्‍यांनाच मिरज मध्ये सरकारी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.  एकाच कुटुंबातील सुमारे 12 जण कोरोना बाधित झाले आहेत. यापैकी 11 जण सांगलीच्या इस्लामपूर गावातील आहेत. तर एक जण कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवाडगाव ची रहिवासी आहे. ती त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आली होती. सध्या सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 23 पर्यंत पोहचला आहे.  Coronavirus in Maharashtra: डोंबिवली येथील 25 वर्षीय तरुण COVID-19 पॉझिटिव्ह; तुर्कीहून परतल्यावर हजारो पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या विवाहसोहळ्याला लावली हजेरी.  

एकाच कुटुंबातील लोक एकमेकांच्या संपर्कात आल्याने या गावात कोरोना व्हायरसचा धोका वाढणार याचा अंदाज होता त्यामुळे तातडीने सार्‍यांचे नमूने पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑर वायरॉलजी (एनआईवी) कडे पाठवण्यात आले होते. कोरोनाचा अशाप्रकारे फैलाव झपाट्याने होत आहे. त्याला वेळीच न रोखण्यास हा आजार भयाण रूप घेऊ शकतो. म्हणून नागरिकांना संचारबंदी लावत घरीच बसण्याचा आणि सोशल डिस्टंन्सिंगचा पर्याय सुचवला आहे. राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना संचारबंदीच्या काळात स्वयंशिस्त पाळण्यासाठी आवाहन केलं आहे.

ANI Tweet 

सध्या या कोरोनाबाधित कुटुंबाच्या घराजवळील भागामध्ये प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. यांच्या संपर्कात आलेल्यांच्या प्रकृतीचीदेखील वारंवार चौकशी केली जात आहे. तसेच आजुबाजूच्या भागातील नागरिकांना त्यांच्या घरातून एकावेळेस विशिष्ट व्यक्तीलाच बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणार्‍यांचेही प्रमाण पुढील काही दिवसांत वाढेल असा आशावाद राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी नागपूर मध्ये 5 नवे रूग्ण आढळले होते. विदर्भातील गोंदियामध्ये 1 तर नागपूर मध्ये 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.