भारत देशात कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. अशा गंभीर परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुण्याचे (Pune) शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद कुलकर्णी (Dr. Milind Kulkarni) यांनी कोरोना रुग्णांची सॅपल्स (Samples) गोळा करण्यासाठी एक कीट तयार केले आहे. त्यांनी Polymer Swabs ची निर्मिती केली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची चाचणी करण्यासाठी सॅपल गोळा करणे अधिक सोपे जाईल. Polymer Swabs या आपल्या निर्मिती बद्दल बोलताना डॉक्टारांनी सांगितले की, "हा polymer-based कीट बनवताना swab स्टिक बनवण्यासाठी पॉलीप्रोपीलीन मटेरियलचा वापर केला असून पॉलिस्टर फायबरचा वापर swab बनवण्यासाठी केला आहे."
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे Polymer Swabs भारतात आयात केले जातात. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे या कीटचा पुरवठा भारतात होऊ शकत नाही. त्यामुळे या कीटचे नमुने आम्ही बंगळुरु (Bengaluru) येथे डॉ. के एन श्रीधर (Dr. KN Sridhar) यांना पाठवले आहे. तिथे या कीटचे क्लिनिकल ट्रायल करण्यात येईल, अशी माहिती डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. क्लिनिकल ट्रायलच्या रिपोर्ट्सनंतर आपल्याकडे या कीटचा वापर सुरु होऊ शकतो.
ANI Tweet:
Dr. Milind Kulkarni, scientist: India imports polymer swabs and due to the lockdown there is no supply of the kits in the country. We will be sending prototype of the kit to our collaborator Dr. KN Sridhar in Bengaluru where it will undergo a clinical trial. #Maharashtra https://t.co/y0YacqrarE
— ANI (@ANI) April 4, 2020
यापूर्वी पुण्यातील डॉ. मीनल भोसले यांनी कोरोना व्हायरसच्या पहिल्या भारतीय बनावटीच्या टेस्टिंग कीटची निर्मिती केली होती. त्यामुळे परदेशी कीट्सवर अवलंबून न राहता कमी खर्चात आणि कमी वेळेत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची टेस्ट करणे शक्य झाले आहे. कोरोना व्हायरस भारतात थैमान घालायच्या प्रयत्नात असला तरी त्याला परतवून लावण्याचे सचोटीचे प्रयत्न सर्व पातळीवर सुरु आहेत.