doorstep delivery services | Photo Credits: Pixabay

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पुढे 21 दिवस म्हणजे 14 एप्रिल पर्यंत नागरिकांच्या घराबाहेर फिरण्यावर बंधनं घालण्यात आल्याने लोकांना नेहमी लागणार्‍या वस्तू, किराणामाल, दूध यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड पहायला मिळाली आहे. मात्र मुंबईसह देशभरात नागरिक भीतीपोटी बाहेर पडत असल्याने आता काही ठिकाणी घरपोच सेवा देण्यासाठी काही दुकानं खुली ठेवली आहे. यामध्ये बिग बाजार ची दुकानं देशभरात खुली ठेवली जाणार आहे. दरम्यान काही भागामध्ये बिग बाजार घरपोच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये बिग बाजार ही सोय खुली करून देणार आहे. सांगली: लॉकडाऊनच्या काळात नागरिकांंना घरबसल्या दूध, भाजीपाला, औषधं मिळणार; 'या' संपर्क क्रमांकावर मिळेल मदत.

बिग बाजारने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सरकारकडून देखील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. परंतू नागरिकांनी एकत्र बाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

बिग बाजारची मुंबई मधील घरपोच सेवा कुठे मिळेल?

बिग बाजारची महाराष्ट्रात घरपोच सेवा कुठे मिळेल?

दरम्यान राज्यात आता कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होऊन ती 116 पर्यंत पोहचली आहे. दरम्यान आज (25 मार्च) सकाळी सांगली येथील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं समोर आलं आहे तर आता मुंबई शहरामध्ये 4 नवे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.