Mumbai | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. ताज्या आकडेवारीनुसार मुंबई शहराने कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहारतील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या आता 15,581 इतकी झाली आहे. आज (बुधवार, 13 मे 2020) दिवसभरात मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमित 800 नव्या रुग्णांची नोंद झाली. शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याची एकूण संख्या 595 इतकी आहे. यात आज मृत्यू झालेल्या 40 रुग्णांचाही समावेश आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 25, 922 इतकी झाली आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने आतापर्यंत 5,547 रुग्णांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. दरम्यन, महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरस संक्रमित 495 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना व्हयरस संक्रमित 54 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित मृतांचा आकडा 975 इतका झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण संख्या 25,922 तर आतापर्यंत 5,547 जणांना डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

पीटीआय ट्विट

भारतातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 74281 इतकी झाली आहे. त्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 47480 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 2415 इतकी झाली आहे. तर उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने देशभरातून 24386 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.