देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून कोरोनाबाधितांच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत. मात्र काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबावर आजूबाजूच्या नागरिकांकडून बहिष्कार टाकल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभुमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याची प्रकरणांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अंनिस यांनी अशा नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
समाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत कोरोना रुग्णांच्या परिवारावर बहिष्कार टाकल्यास कारवाई कराव्यात अशी मागणी अंनिस यांनी केली आहे. तसेच सरकारने या संबंधित एक परिपत्रक काढून पोलिसांना गुन्हे दाखल करण्याच्या सुचना सुद्धा दिल्या आहेत. तर कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला धीर देण्याची गरज असते. मात्र नागरिकांकडून बहिष्कार टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईतील घाटकोपर, नाशिक आणि शहादा येथे असे प्रकार समोर आले आहेत. डॉक्टर, रुग्णांवर बहिष्कार टाकल्याची प्रकरणाच्या तक्रारी अंनिस यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणासंबंधित लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.(भिवंडीत भाजी खरेदी करण्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवारा, गर्दीमुळे तीन बत्ती मार्केट बंद)
दरम्यान,महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6427 वर पोहचला आहे. तर 283 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांना जागृक होऊन कोरोनाची साखळी तोडायची असल्यास नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तर देशात कोरोनाचे रुग्ण 12 हजारांपेक्षा अधिक आहेत. येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु 3 मे नंतर लॉकडाउनच्या नियमासंदर्भात काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.