Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश कायम ठेवत नागरिकांना घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा असून त्याच्या विरोधात लढण्याासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर यवतमाळ येथे आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यवतमाळ (Yavatmal) जिल्हातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 वर पोहचल्याची माहिती जिल्हाधिकारी एमडी सिंग यांनी दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात येत आहे. तसेच अद्याप कोरोना व्हायरसवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करुन त्यांची प्रकृती सुधारण्यास मदत करत आहेत.

राज्य सरकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. तसेच नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरीच थांबा असे आवाहन करत आहेत. मात्र नागरिकांकडून काही ठिकाणी कोरोनाचे आणि लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे ही सांगण्यात आले आहे. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी जात असल्यास मास्क घालणे अनिवार्य आहे.(कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांसाठी दवाखाने, नर्सिंग होम वारंवार सुचना देऊन बंद ठेवणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे माहापालिका आयुक्तांचे आदेश)

दरम्यान, महाराष्ट्राची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर 20 एप्रिल पासून उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत कोरोनाच्या नॉन हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाची सद्यची स्थिती पाहता नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही सांगण्यात आले आहे.