Mumbai | |Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे मुंबई रेड झोन (Mumbai RED ZONE) मध्ये आहे. त्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) चारमध्येही मुंबई शहरातील नियम शिथील करण्यात आले नाहीत. परिणामी प्रशासनाच्या अधिकृत परवानगीशिवाय अत्यावश्यके सेवा, आवश्यक अथवा अनावश्यक कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. अन्यथा वाहन चालक आणि संबंधित नारगकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. लॉकडाऊन आणि राबवले जाणारे नियम हे नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच असल्याची माहितीही मुंबई पोलीस देतात.

मुंबई शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांबाबतची आतापर्यंत आमच्याकडे आलेल्या शेवटच्या माहितीनुसार, मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 21152 इतकी आहे. त्यातील 20154 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने 5516 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर आतापर्यंत कोरोना संक्रमित 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1185 रुग्ण आढळून आल्याने आकडा 21152 वर पोहचला, महापालिकेची माहिती)

मुंबई पोलीस ट्विट

मुंबई पोलीस ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा जसा मुंबईत अधिक आहे. तसेच, मुंबईत सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही धारावी परिसरात आहे. धारावी परिसर हा झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. एकट्या धारावी परिसरात 1327 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 56 जणांचा मृत्यू झाला आहे.