Covid-19: ठाणे आणि मुंबई येथे कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. आज सायंकाळीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत टोपे यांनी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा अधिकृत आकडा हा 12 असल्याचे म्हटले होते. मात्र, आता पुन्हा आणखी 1 रुग्ण सापडल्याने हा आकडा वाढून आता 14 वर पोहोचला आहे.
ठाणे येथे आढळलेल्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णाची माहिती समजू शकली नाही. हा रुग्ण नेमका कशामुळे कोरोना बाधित झाला. तो विदेशातून आला आहे का की विदेशातून आलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तिच्या संपर्का आला होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणे नेमकी किती तीव्रतेची आहेत. याबाबतही माहिती मिळू शकली नाही. अर्थात रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सामाजिक प्रतिमा बिघडू नये तसेच समाजाकडून त्यांना मानसिक त्रास होऊ नये यासाठी रुग्णाची नाव, गाव आदी तपशीलाची माहिती गुप्त ठेवली जात आहे. (हेही वाचा, Covid-19: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितला राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा अधिकृत आकडा)
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतना राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 असल्याचे म्हटले होते. या 12 रुग्णांपैकी पुणे 9, मुंबई 2 आणि नागपूर येथे 1 असा तपशीलही दिला होता. मात्र, ठाण्यात आता आणखी एक नवा रुग्ण आढळल्याने ही संख्या आता 13 वर पोहोचली आहे.