चीन (China) मधील वुहान शहरात लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर चीन देशात तब्बल 10 हजार जणांना कोरोना वायरसची लागण झाली आहे. त्यातील 213 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला असून केरळ येथे त्याचा रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. पण कोरोना व्हायरमुळे भारता मधील काही नागरिक चीन येथे अडकल्याने त्यांच्याबाबत काळजी व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर रत्नागिरी येथील तीन विद्यार्थिनी चीन येथे शिकण्यासाठी गेल्या असून त्या सुखरुप असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एबीपी माझा यांना दिली आहे.
सुमेना हमदुले, झोया महशवाल आणि सादीया मुजावर अशी विद्यार्थिनींची नावे आहेत. तर या तिन्ही विद्यार्थिनी चीन मधील नानटॉग प्रांतातील विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या आहेत. चीन मध्ये कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता त्यांच्या पालकांना त्यांची काळजी वाटत होती. पण तिघीजणी सुखरुप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कोरोना व्हायरमुळे येथील नागरिकांना घराबाहेर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच भारतीय दूतवासांच्या मदतीने चीन मधील भारतीयांना सुखरुप आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.(केरळमध्ये Coronavirus चं निदान झालेल्या तरूणीची प्रकृती स्थिर; अजून एक रूग्ण Isolation Ward मध्ये दाखल; आरोग्यमंत्री शैलजा यांची माहिती)
कोरोनाची लागण जनावरे आणि नागरिकांना होऊ शकते. याची लागण झाल्यास श्वसनासंबंधित समस्या उद्भवतात. तसेच सर्दी होणे, खोकला आणि घसा खवखवणे अशी या कोरोना व्हायरसची लक्षणे आहेत. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.