Coronavirus | ( Photo Credit: Pixabay.com )

यापूर्वी देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) 95 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra) 10 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.  आता महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्णांनी 10 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 7 लाख रूग्ण बरे झाले आहेत. दुसरीकडे, कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत ठाणे महापालिका  (Thane Municipal Corporation) हद्दीत मास्क (Mask) न घालणाऱ्या लोकांना 500 रुपये दंड आकारण्याचा कठोर नियम महापालिकेने लावला आहे. याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘कोविड-19 चा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध 500 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात येणार आहे.’

ठाणे महापालिका ट्वीट -

पुढे म्हटले आहे, ‘या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण व कर विभागाचे बीट निरीक्षक, बीट मुकादम त्याचप्रमाणे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.’ सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई व ठाणे हे सर्वाधिक प्रभावित जिल्हे आहेत.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटना पाहता हा नियम लावणे आवश्यक होते, असे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ठाणे शहरात कोरोना विषाणू रुगानंची एकूण संख्या 29463 आहे, तर 885 लोकांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांनीही नुकताच असा आदेश दिला आहे. शेजारच्या पालघर जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यातील जनतेला मास्क घालण्याची सूचना केली आहे. या आदेशाचे कोणाही उल्लंघन केल्यास त्याला जागेवरच शिक्षा होईल, असे एका वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा: Bharat Biotech Covaxin Update: भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची प्राण्यांवर यशस्वी चाचणी; माकडांमध्ये Coronavirus च्या Antibodies केल्या विकसित)

दुसरीकडे कोविड-19 च्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध याविरूद्ध झारखंड सरकारने कडक कायदे केले आहेत. येथे जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले तर त्याला 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे व त्याला 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.