Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus in Mumbai Update: महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. अशातच मुंबईत सुद्धा आज सलग दुसऱ्या दिवशी 1 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाल्याची माहिती महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत दिली आहे. त्यामुळे नागरिकांनो तुम्हाला पुन्हा एकदा लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा.

मुंबईत आज 1145 रुग्ण आढळले असून 462 जणांचा आज डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर 94 टक्के आहे. त्याचसोबत शहरात 24 फेब्रुवारी पर्यंत 32,08,685 कोरोनाच्या चाचण्या पार पडल्याचे ही महापालिकेने म्हटले  आहे. (Coronavirus in Mumbai: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील Oval Maidan 26 फेब्रुवारीपासून 15 दिवस बंद)

Tweet:

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन  नाईट कर्फ्यू यांसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे. यावर बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केल आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊन होऊ शकतो, असे शेख म्हणाले.