मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा घेतला निर्णय
Kishori Pednekar (Photo Credit: Twitter)

पोलीस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांनाही करोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये 53 पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये (Self Quarantine) राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील 14 दिवस कोणालाही भेटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघाने मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये 168 जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार 168 पैकी 53 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजत आहे.

“मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आणि आरोग्य चेअरमेन अमेय घोले यांनी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून बंगल्यावर सर्वांची तपासणी केली जात आहे. काही पत्रकारांसोबत माझा संपर्क आलेला होता. त्यामुळे मी स्वत:ची तपासणी करत आहे. आपल्यामुळे इतरांना लागण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे”,असे किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. हे देखील वाचा- मुंबईतील धारावीत आणखी 30 रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या 168 वर पोहचली

किशोरी पेडणेकर यांचे ट्वीट-

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबईत तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 4666 वर पोहोचली आहे. राज्यात आज सायंकाळी 6  वाजेपर्यंत नव्या 466 रुग्णांची वाढ झाली. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, मुंबई महापालिका मुख्यालयातील कर्मचारी यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे.