महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लॉकडाउन पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तर मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्यांचे रेड झोन मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहेत. तर मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आणखी 30 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 168 वर पोहली आहे. याबाबत महापालिकेने माहिती दिली असून धारावीत (Dharavi) 11 जणांचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत नवे 187 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
धारावीत दाटीवाटीने नागरिक राहत असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे कठीण आहे. तर महापालिकेकडून सुद्धा धारावी परिसरात स्वच्छता केली जात आहे. धारावी हा कंन्टेटंमेन्ट झोन जाहीर करण्यात आला असून येथील कोणत्याच कामांना परवानगी नाही आहे. तसेच परिसर सील ही करण्यात आला आहे. आता धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 150 च्या पार गेला आहे. तर मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी ड्रोनची नजर राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात होते.(महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 283 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचला- आरोग्यमंत्री राजेश टोपे)
30 new #Coronavirus positive cases reported today in Dharavi. The total number of positive cases in the area increases to 168 (including 11 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC). #Mumbai pic.twitter.com/g9paEWRUvI
— ANI (@ANI) April 20, 2020
दरम्यान, कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करत आहेत.देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.